Tarun Bharat

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, सुनील महाराजांची पहिली प्रतिक्रिया

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Mahant Sunil Maharaj) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. महंत सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यांनतर सुनील महाराजांनी बोलताना, याआधी संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत. त्यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकरलं आहे. आम्ही महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढला जाणार आहे, अशी भूमिका यावेळी महंत सुनिल महाराज यांनी मांडली.

हे ही वाचा : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश

“आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाची यात्रा आहे. तिथे दोन लाख बंजारा आहेत. त्या मुहूर्तावर मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलो. मी मागेच म्हणालो होतो की नवरात्रीत मोठा निर्णय होणार. शुभ दिवस आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत संपूर्ण राज्यातून दीड ते दोन कोटी बंजारा भाविक, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सत्तेत वाटा देण्यासाठी शिवसेनाच योग्य आहे, शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकते हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत”, असं यावेळी सुनील महाराज म्हणाले.

Related Stories

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Tousif Mujawar

वाकेश्वर- भुरकवडीत हवाई सर्वेक्षण : ड्रोनच्या सहाय्याने पथदर्शी प्रयोग

Archana Banage

कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा बंद, प्रवाशांची गैरसोय होणार

Archana Banage

सांगली जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांना मान्यता : जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

उस्मानाबाद : तरुणीच्या खुनाबद्दल तीघांना जन्मठेप

Archana Banage

शेतकर्‍यांसंबंधी सरकारला अतिशय आदर

Patil_p
error: Content is protected !!