Tarun Bharat

धक्कादायक : ‘टिपी’तील फाईलचं गायब

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

नगररचना विभागातील (टिपी) फाईल गायब झाली असल्याचा गुन्हा सोमवारी महापालिकेच्यावतीने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. यामुळे टिपीतील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. याबाबतची फिर्याद महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता गुंजन विजय भारंबे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

राजारामपुरी येथील अतिक्रमणाच्या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी राजारामपुरी येथील 90 बंदिस्त पार्किंगची यादी तयार करून कारवाई केली नसल्याचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी निदर्शनास आणले. यावेळी राजारामपुरीतील एका हॉस्पिटलची फाईलच गायब झाल्याचा आरोपही झाला होता. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ही बाबही पुन्हा ऍड. इंदूलकर यांनी निदर्शनास आणली. यानंतर डॉ. बलकवडे यांनी तत्काळ फाईल गहाळ झाल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी भारंबे यांनी तक्रार दिली. यामध्ये ई वॉर्ड येथील एका मिळकतीची फाईल व कागदपत्रे 29 एप्रिल 2017 पासून आजपर्यंतच्या मुदतीत गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.नगररचना विभागासारख्या प्रमुख विभागातील फाईल गायब होणे हा प्रकार गंभीर आहे. महापालिकेचा ढिसाळ कारभार यातून स्पष्ट होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी टिपीत विशेष लक्ष देवून येथील कीड काढण्यासाठी ऑपरेशन स्पेशल मोहीम घेण्याची गरज आहे.असे इंदुलकर म्हणाले आहेत.

Related Stories

कोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात एकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

सीमाप्रश्नी भाजपचे धोरण दुटप्पी : खा. विनायक राऊत

Abhijeet Shinde

आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गम’

Abhijeet Khandekar

‘वारणा दूध संघास बिहारला मिल्क मिक्स कॉन्सनट्रेट दूध पुरवठा करण्याची ऑर्डर’

Abhijeet Shinde

चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री? चर्चेला पूर्णविराम मिळणार

Abhijeet Shinde

अत्यवस्थ कोरोना रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी शेवटपर्यंत लढूया: मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!