वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डोहा-कतार येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताची युवा नेमबाज गणेमत सेखॉने महिलांच्या स्किट पात्र फेरीच्या नेमबाजीत नववे स्थान मिळवले पण तिने या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी साधली.
चंदिगडची 22 वर्षीय महिला नेमबाज गणेमत सेखॉने महिलांच्या स्किट पात्र फेरीच्या पहिल्या दोन दिवसांच्या कालावधीत 125 पैकी 120 गुण घेतले. पण त्यानंतर पात्र फेरीच्या शेवटच्या फेरीत तिला पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही. सेखॉ नवव्या स्थानावर राहिली. भारताच्या दर्शना राठोडने 117 गुण नोंदवत 25 वे तर माहेश्वरी चौहानने 116 गुण नोंदवत 28 वे तसेच संजना सुदने 114 गुण नोंदवत 26 वे स्थान मिळवले.
पुरुषांच्या स्किट नेमबाजीत भारताच्या अनंतजित सिंग नेरुकाने 120 गुण नोंदवत 31 वे तर गुरज्योत खंगुराने 35 वे स्थान मिळवले.