Tarun Bharat

नेमबाज रणवीर काटकरची पदकांची लयलूट

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : एअर रायफल प्रकारात दहा पदकांची कमाई

कोल्हापूर / प्रतिनिधी

त्रिवेंद्रम (केरळ) येथे सुरू असलेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा आंतराष्ट्रीय नेमबाज रणवीर अजितसिंह काटकर यांने 10 मी एअर रायफल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व प्रतिनिधित्व करताना तब्बल 10 पदके मिळवून नवीन विक्रम नोंदवला. या स्पर्धेत देशभरातून एकहजारहून अधिक नेमबाज 10 मीटर रायफल प्रकारात सहभागी झाले होते.

रणवीरने दहा मीटर एअर रायफल प्रकारात क्वालिफिकेशन राउंड मध्ये 626.8 गुण मिळवत युथ आणि ज्युनियर गटात प्रवेश केला. या गटात त्याने प्रत्येकी एक रौप्य पदक मिळवले. रुद्रांश पाटील व गजानन खंडगले यांच्या साथीने रणवीरने आयएसएसएफ सीनियर गटामध्ये सांघिक रौप्य पदक मिळवले. आयएसएसएफ ज्युनिअर गटामध्ये रुद्रांश पाटील व निमेश जाधव यांच्या साथीने रणवीरने सुवर्णपदकांवर कब्जा केला. आयएसएसएफ युथ गटांमध्ये रुद्रांश पाटील व पार्थ माने यांच्या साथीने आणखीन एक सुवर्णपदक मिळवले. सिव्हिलियन प्रकारामध्ये युथ आणि ज्युनियर गटामध्ये वैयक्तिक दोन कास्य पदके मिळवली. सांघिक प्रकारात सिनियर गटात गजानन खंडगले आणि निमेश जाधव यांच्या साथीने सुवर्णपदक तर जुनियर गटात निमेश जाधव व राहुल शर्मा यांच्या साथीने सुवर्णपदक मिळवले.

10 मी एअर रायफलएअर रायफल मिश्र प्रकारात आर्या बोरसे सोबत एक कास्य पदक मिळवले. या स्पर्धेत 10 मी एअर रायफलया एकाच प्रकारामध्ये 10 पदके घेणारा रणवीर एकमेव खेळाडू ठरला. रणवीर येथील रामानंदनगर येथील वेध रायफल अँड पिस्टल शूटिंग अ‍ॅकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडू राधिका बराले- हवालदार व रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Related Stories

इतक्यात निवृत्ती नाही : व्हिनस विलीयम्स

Patil_p

श्रीलंका-बांगलादेश यांच्यात आज लढत

Patil_p

पूर्ववैमनस्यातून दुचाकी पेटवली, दोघांना अटक

Archana Banage

प्रशिक्षक रजपूत पाक दौऱयापासून अलिप्त

Patil_p

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून सीपीआरला 40 लाखांचा निधी

Archana Banage

मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सुकाणु समिती

Archana Banage