Tarun Bharat

नेमबाज रुद्रांक्ष पाटील प्रेसिडेंट चषकाचा मानकरी

वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)

येथे झालेल्या आयएसएसएफच्या प्रेसिडेंट चषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताचा अव्वल नेमबाज रुदांक्ष पाटीलने दर्जेदार कामगिरी करत प्रेसिडेंट चषकाचा मानकरी ठरला. त्याने 10 मीटर रायफल नेमबाजीत इटलीच्या डॅनिलो सोलाझोचा 16-8 असा पराभव केला.

इजिप्तमध्ये झालेल्या या स्पर्धेत 42 देशांचे नेमबाज सहभागी झाले होते. सदर स्पर्धा 28 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 4 डिसेंबरला ती संपणार आहे. इजिप्तमध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यात आयएसएसएफची रायफल-पिस्तुल विश्व नेमबाजी स्पर्धा भरविण्यात आली होती. भारताचा 18 वषीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या स्पर्धेत पाटीलने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा रुद्रांक्ष पाटील हा भारताचा सहावा नेमबाज आहे. यापूर्वी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, तेजस्विनी सावंत, मानवजित सिंग संधू, ओमप्रकाश मिठरवाल आणि अंकुर मित्तल यांनी हा पराक्रम केला होता.

Related Stories

मँचेस्टर युनायटेडच्या मित्रत्वाच्या सामन्यात रोनाल्डो खेळणार

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन

Patil_p

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत इरिगेसी, वैशाली विजेते

Patil_p

मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीचे अनावरण

Patil_p

विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या रूपरेषेत बदल

Amit Kulkarni