वॉशिंग्टन
अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. आता देशाची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये सोमवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली आहे. जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला असून यात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कॉन्डो कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला होता. परंतु हल्लेखोराबद्दल अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यापूर्वी इंडियानाच्या ग्रीनवुड पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांना जीव गमवावा लागला होता.