Tarun Bharat

मारुती गल्ली येथे दुकानाला आग

Advertisements

शॉर्टसर्किटने घटना घडल्याचा संशय

प्रतिनिधी/बेळगाव

दसरोत्सवात खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली आहे. सर्वत्र सणाचे वातावरण असतानाच सोमवारी रात्री मारुती गल्ली येथील तळमजल्यावरील एका दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली असून लाखो रुपयांचे साहित्य आगीत खाक झाले. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच धावपळ उडाली.

आगीचा प्रकार उघडकीस येताच अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन बंबासह जवान दाखल झाले. खडेबाजार पोलीसही दाखल झाले. अग्निशामक दलाचे एस. एस. निलगार, व्ही. एस. टक्केकर,

आय. वाय. मडीगेर आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

योगानंद स्टेशनरी या दुकानाला आग लागली आहे. बघता बघता शेजारच्या दुकानालाही आग लागली. स्टेशनरी दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातही आगीमुळे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्मयात आणली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

Related Stories

पै.नागराज बसीडोनीकडून पै.संतोष पडोलकर चितपट

Amit Kulkarni

मराठी भाषिकांचा भर पावसातही एल्गार

Amit Kulkarni

फौंड्रीमन संघटनेतर्फे उद्योजकांसाठी कार्यशाळा

Amit Kulkarni

एपीएमसीत सात ट्रकमधील डिझेलची चोरी

Amit Kulkarni

बेळगुंदी-हिरेबागेवाडी पूर्णपणे लॉकडाऊन

Patil_p

कर्नाटक राज्यपालांनी सिद्धरामय्या यांना लिहले पत्र

Archana Banage
error: Content is protected !!