मंत्री उमेश कत्ती यांचे वकिलांना आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राहक आयुक्त फोरम बेळगावात स्थापन करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हे न्यायालय लवकरच सुरू केले जाईल. मात्र त्यासाठी वकिलांनीच तातडीने जागा दाखवावी, त्या ठिकाणी लवकरात लवकर हे फोरम सुरू करू, असे ठोस आश्वासन अन्न व नागरी पुरवठा, वनमंत्री यांनी दिली.
बार असोसिएशनच्या जुन्या लायब्ररीमध्ये मंत्री उमेश कत्ती आले होते. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. ग्राहक आयुक्त फोरम बेळगावमधून गुलबर्गा येथे हलविण्यात आले होते. मात्र येथील वकिलांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे पुन्हा हे न्यायालय या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. बार असोसिएशनच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे पाठपुरावा करा, असे आवाहन त्यांनी केले. ग्राहक आयुक्त फोरम या ठिकाणी स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घ्यावा आणि या न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, जॉईंट सेपेटरी बंटी कपाई आदी उपस्थित होते. जनरल सेपेटरी गिरीराज पाटील यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला अभिषेक उदोशी, इरफान बयाळ, पूजा पाटील, आदर्श पाटील, ज्ये÷ वकील एम. बी. जिरली, ऍड. सुलतानपुरी उपस्थित होते.