Tarun Bharat

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर कोल्हापूरात ‘हर हर महादेव’चे शो बंद

कोल्हापूर / प्रतिनिधी :

Shows of ‘Har Har Mahadev’ closed in Kolhapur after Sambhaji Brigade’s warning ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराविषयी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून, त्यांनी कोल्हापूरात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज चित्रपटगृहांनी या चित्रपटाचे पोस्टर हटवून शो बंद ठेवले आहेत.

या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या चित्रपटाला विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर कोल्हापुरातही ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : आम्ही राज्यात नवे उद्योग आणू; राणेंचं आश्वासन

पुणे, पिंपरी-चिंचवडसह, औरंगाबाद, ठाणे यासारख्या अन्य शहरांमध्येही संभाजी ब्रिगेडने या चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत.

Related Stories

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1243 वर 

Tousif Mujawar

Kolhapur : जिल्ह्यात सुमारे सव्वालाख अतिक्रमणावर पडणार हातोडा

Archana Banage

महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

उत्तराखंड बोर्ड : 25 ते 30 जुलै या कालावधीत लागणार परीक्षांचे निकाल

Tousif Mujawar

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला पुरावा

Archana Banage

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

Tousif Mujawar