Tarun Bharat

श्रद्धाला मिळाला बिगबजेट चित्रपट

Advertisements

टायगर श्रॉफची नायिका म्हणून झळकणार

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियां, छोटे मियां’ पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटात हे दोन्ही अभिनेते जबरदस्त ऍक्शन्स करताना दिसून येतील. आता या रिमेक चित्रपटासाठी टायगर श्रॉफची नायिका निवडण्यात आली आहे.  या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरची वर्णी लागल्याचे समजते. यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरीही श्रद्धा कपूरचे नाव  निश्चित असल्याचे मानले जात आहे. श्रद्धा आणि टायगर ही जोडी यामुळे दुसऱयांदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते चित्रिकरणाची स्थळं निश्चित करण्यासाठी लवकरच युरोपला जाणार आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या चित्रपटाचे चित्रिकरण स्कॉटलंड, ऑस्ट्रियन आल्प्स, सौदी अरेबिया आणि लंडनमध्ये होऊ शकते. सध्या हा चित्रपट निर्मितीपूर्व स्थितीत असून जानेवारी 2023 मध्ये याचे चित्रिकरण सुरू होऊ शकते. या चित्रपटातील ऍक्शनदृश्यांसाठी जगभरातील अनेक स्टंट टीम्स सामील होणार आहेत.

निर्मात्यांनी या चित्रपटाचे बजेट वाढवून तीनपट केल्याचा दावा करण्यात येत आहे. या चित्रपटाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात एक टीझर सादर करत करण्यात आली होती.

Related Stories

तुझं माझं जमतंयच्या सेटवर पार्टी हो रही है!

Patil_p

माजी कर्णधार MS धोनीची फिल्मी जगतात एंट्री,’धोनी एंटरटेनमेंट’प्रोडक्शन हाऊस सुरु

Archana Banage

प्लॅनेट मराठी’वर 30 जूनला झळकणार ‘जून’

Patil_p

मग काय हाताची घडी घालून बसू का?

Patil_p

अभिनेत्री रिया सेन राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील

Abhijeet Khandekar

पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत- कंगना राणावत

Archana Banage
error: Content is protected !!