Tarun Bharat

सरस्वती वाचनालयात श्रावण संगीत महोत्सव

बेळगाव  / प्रतिनिधी

शहापूर येथील सरस्वती वाचनालय व संगीत कला मंच विभाग प्रस्तुत शनिवारी श्रावण संगीत महोत्सव झाला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ऋषिकेश हेर्लेकर व विजय बांदिवडेकर यांनी शास्त्राrय संगीत सादर केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजय देशपांडे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. यावेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऋषिकेश हेर्लेकर यांनी मिया मल्हार एकताल विलंबित करिमनाम तेशे (बोल), तीनताल दुतमध्ये बिजरी चमके बरसे, घन गरजे… तराना व भजन सादर केले. यावेळी तबल्यावर संतोष पुरी व हार्मोनियमवर मुपुंद गोरे यांनी साथ दिली.

यावेळी विजय बांदिवडेकर यांनी राग (पुरिया धनाश्री-विलंबित) एकताल दुत बली बली जाऊ, दुत तीनताल पायलीया झंकार मोरी, भजनामध्ये बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल सादर केला. तबल्यावर राहुल मंडोळकर तर हर्मोनियमवर मुकुंद गोरे यांनी साथ दिली. सूत्रसंचालन सविता पारनट्टी यांनी केले. याप्रसंगी रसिक श्रोते उपस्थित होते.  

Related Stories

बेळवट्टीतील मराठी शाळेची इमारत कोसळली

Amit Kulkarni

शाळा इमारत बांधकाम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

मध्यवर्तीचा चलो कोल्हापूर’चा नारा

Amit Kulkarni

आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली काळाची गरज

Omkar B

बिम्स्वरील हल्ला प्रकरणी

Patil_p

सर्वसामान्य रुग्णांसाठी रेमडेसिवीर उपलब्ध करा

Amit Kulkarni