Tarun Bharat

स्फूर्तीगीत गायन स्पर्धेत श्री कमळेश्वर हायस्कूल प्रथम

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटी आणि कीर्ती विद्यालय शिवोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्फूर्तीगीत स्पर्धेत श्री कमळेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. द्वितीय बक्षीस लोकशिक्षण हायस्कूल धारगळने तर तृतीय बक्षीस हरमल पंचक्रोशी विद्यालय हरमल यांना प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कीर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कोचरेकर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकमान्य सोसायटी सहकार क्षेत्रापुरती मर्यादित संस्था नसून समाजाच्या कल्याणासाठी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नवनवे उपक्रम राबवित असल्याने गोमंतकीयांना ती आपली संस्था वाटते. देशाच्या अमृत मोहत्सवी वर्षात विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांची स्पर्धा आयोजित करून देशभक्तीला प्राधान्य दिले आहे. गोमंतकीय भूमी ही देवभूमी असून सध्य परिस्थितीत देवाबरोबरच मातृभूमीचे स्मरण तरुणाईच्या मनात जागविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री. कोचरेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर लोकमान्यचे झोनल मॅनेजर कुमार प्रियोळकर, साहाय्यक मॅनेजर अँथनी आझावेदो, डॉ. गोविंद काळे, परीक्षक नरेश पार्सेकर आणि अरुण  गावकर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ. गोविंद काळे यांनी रामायणातील ‘जननी’ जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयासी हा श्लोक तरुणाने अंतकर्णात बिंबवला पाहिजे. प्रसंग पडते आणि गरज भासेल त्यावेळी राष्ट्रकार्यात तन मन धनपूर्वक सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईना केले.

स्पर्धेमध्ये एकूण शिवोली परिसरातील नऊ विद्यालयांनी भाग घेतला. स्फूर्तीदायक अशा या स्पर्धेत वंदे मातरम व भारत माता की जयच्या घोणषा वारंवार सहभागी पथकाकडून दिल्या जात होत्या. पारितोषिकाचे वितरण मुख्याध्यापक श्री. कोचरेकर यांच्याहस्ते करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता घोडगे यांनी केले. आभार हरमल बॅचचे मॅनेजर नरेश पेडणेकर यांनी मानले.

Related Stories

दोन वर्षानंतर लोहिया मैदानावर क्रांती दिन कार्यक्रम

Amit Kulkarni

वाळपईतीलच उमेदवारांना नोकऱया देणाऱया आरोग्यमंत्र्यांवर कारवाई करा

Amit Kulkarni

इमॅजिन पणजीच्या बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा

Patil_p

दुर्भाटच्या दृष्टादेवीपुढे शेकडो भाविकांनी फेडले नवस

Amit Kulkarni

भ्रमणध्वनी, दागिने चोरणाऱया बंगाली चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni

न्यू मार्केटमधील सर्व दुकाने खुली करण्यास मज्जाव

Omkar B
error: Content is protected !!