प्रतिनिधी / बेळगाव : येथील नाभिक समाज सुधारणा मंडळ श्री संत सेना मंदिराचे नूतनीकरण सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सेक्रेटरी व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धराकरिता रोख रक्कम दिली आहे. मंदिर व हॉल चांगल्या प्रकारे कसा बांधता येईल व सरकारकडून निधी प्राप्त करण्याकरिता प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गणेश यादव, चंद्रकांत पन्हाळकर, महादेव वाघमारे, कृष्ण पवार सुनील देवकर, अशोक गंगाधर यावेळी उपस्थित होते.