Tarun Bharat

नौसिखिये’मध्ये श्रेया धन्वंतरी अन् अभिमन्यू

अमोल पराशरही मुख्य भूमिकेत

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा पुत्र अभिमन्यू दसानी आता ‘नौसिखिये’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात श्रेया धन्वंतरी अन् अमोल पराशर हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ आणि ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिमन्यूने काम केले होते. तर ‘नौसिखिये’ हा चित्रपट छोटय़ा शहरातील कहाणीवर बेतलेला असणार आहे.

हा चित्रपट माझ्यासाठी घरवापसीप्रमाणे आहे. एलिप्सिससोबत हा माझा तिसरा चित्रपट आहे. मी या कॉमेडी चित्रपटाचा हिस्सा होण्यासाठी अत्यंत उत्साही असल्याचे उद्गार श्रेयाने काढले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष सिंह करणार आहेत. चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी याची कथा लिहिली आहे. तर एलिप्सिस एंटरटेनमेंटकडून लायन्सगेट इंडिया स्टुडिओजच्या मदतीने याची निर्मिती करण्यात येणार आहे. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. तर अभिमन्यू अद्याप यशस्वी अभिनेता ठरलेला नाही.

Related Stories

मिस युनिव्हर्स स्पर्धेत उर्वशी परीक्षकपदी

Patil_p

‘दाह’ 14 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

prashant_c

जितक्या टाळ्या तितकेच चाबकाने फटके दिले पाहिजे…मुकेश खन्नाचा व्हिडीओ व्हायरल

Abhijeet Khandekar

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Archana Banage

कमल हासनसोबत झळकणार दीपिका

Patil_p

ट्विटरवर कंगना रनौतचे पुनरागमन

Patil_p