Tarun Bharat

टी-20 मानांकनात श्रेयसची प्रगती, यादव स्थिर

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 मानांकनात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपले दुसरे स्थान कायम राखले तर त्याचा सहकारी श्रेयस अय्यरने सहा स्थानांची झेप घेत 19 वा क्रमांक मिळविला आहे.

या क्रमवारीत यादवनेच 805 गुणांसह भारतातर्फे सर्वोच्च स्थान मिळविले असून पाकचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. विंडीजविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या चार सामन्यात अय्यर अपयशी ठरला होता. पण शेवटच्या सामन्यात त्याने 40 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याचे 578 मानांकन गुण झाले आहेत.

गोलंदाजांमध्ये स्पिनर्स रवी बिश्नोई व कुलदीप यादव यांनीही मानांकनात प्रगती केली आहे. 21 वर्षीय बिश्नोईने मालिकेत दोन सामन्यात 6 बळी मिळविले. त्याने 50 स्थानांची झेप घेत 44 व्या स्थानावर मजल मारली तर कुलदीपने 58 स्थानांची प्रगती करीत 87 वे स्थान मिळविले. शेवटच्या सामन्यात त्याने 3 बळी मिळविले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून तो आता नवव्या स्थानावर आहे. द.आफ्रिकेच्या रीझा हेन्ड्रिक्सनेही फलंदाजांच्या मानांकनात बढती मिळविली असून आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यात त्याने 74 व 42 धावा जमविल्या. तो आता 13 व्या स्थानी आहे. द.आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजने दहा स्थानांची प्रगती करीत 18 वे स्थान मिळविले तर जलद गोलंदाज एन्गिडी (23 वे स्थान) व न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन (31 वे स्थान) यांनीही प्रगती केली आहे. फलंदाजांत बाबर आझम, गोलंदाजांत ऑस्ट्रेलियाचा जोश हॅझलवूड व अष्टपैलूंमध्ये अफगाणचा मोहम्मद नबी यांनी अग्रस्थान कायम राखले आहे

Related Stories

वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये भारतीयांना कठीण ड्रॉ

Amit Kulkarni

आयसीसीच्या इलाईट पॅनेलमध्ये मेनन कायम

Amit Kulkarni

भारतीय महिला संघाचा सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा

Patil_p

युरोपियन नेमबाजी स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

पोलंडची स्वायटेक अजिंक्य

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात धावांचा डोंगर

Patil_p
error: Content is protected !!