ढाका : वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1500 धावांचा टप्पा ओलांडणारा श्रेयस अय्यर हा भारतीय फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील बुधवारी झालेल्या दुसऱया सामन्यात श्रेयसने 102 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 80.39 स्ट्राईक रेटने 82 धावा झळकविल्या होत्या. श्रेयसने वनडे क्रिकेटमध्ये 38 सामन्यात 34 डावात 49.48 धावांच्या सरासरीने 1534 धावा जमविल्या असून त्यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. श्रेयस अय्यरने वनडे क्रिकेटमध्ये नाबाद 113 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली आहे. अय्यरने भारताच्या के. एल. राहुलला तसेच त्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनाही मागे टाकले आहे.


previous post
next post