मुणगे/ प्रतिनिधी-
श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे श्री भगवती हायस्कुल मुणगे चा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक रिया संदीप राणे ९४.४० %, द्वितीय क्रमांक गौरी अरविंद सावंत ९२.८० %, तृतीय क्रमांक शर्वरी मंगेश मुणगेकर ९१ %या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.