सावंतवाडी/ वार्ताहर –
१० वीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली आहे. सावंतवाडी तालुक्यातील शिक्षण सहाय्यक संस्था माजगाव संचालित श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव प्रशालेच्या १०वी चा निकाल १००% लागला असून तन्वी तुकाराम सावंत ९४ % मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रज्ज्वल भाऊसाहेब चवरे याने ९३.८०% गुणांसह द्वितीय तर पूर्वा मंगेश जाधव हिने ९३.२०% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.