Tarun Bharat

श्री घाडीला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

विजापूर येथे इंडी शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या श्री घाडीने 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून यश संपादन करित कर्नाटक संघात निवड झाली आहे.

इंडी येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री घाडीने पहिल्या 5 कुस्त्या चटकदार केल्या. श्री घाडीने पहिल्या लाढतीत चिकोडीच्या पैलवानाला 10-0

तर दुसऱ्या कुस्तीत बिदरच्या पैलवानाला 10-0 उपांत्यपूर्व कुस्तीत बेंगलोरच्या पैलवानला 10-0 उपांत्य फेरीत दावनगेरेच्या पैलवानाला 10-2

अंतिम फेरीत बागळकोटच्या पैलवानावर 13-3 अशा गुणफरकाने सुवर्णपदक पटकावले. तर या स्पर्धेत ओम घाडी याने 45 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले.

श्री घाडी व ओम घाडी हे दोघे धारवाडच्या पवन हायस्कूलमध्ये शिकत आहेत. श्री घाडी व ओम घाडी हे धारवाडच्या साई सेंटरमध्ये कुस्तीचे धडे घेत आहेत. त्याला कुस्ती प्रशिक्षक शंक्रयाप्पा आणि राम बुडकी याचे बहुमूल्य मार्गदर्शन तर मारुती घाडी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

हिंडलगा महालक्ष्मी यात्रेची उत्साहात सांगता

Patil_p

आज व्यापाऱयांचा बंद

Amit Kulkarni

नगर राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे हिंदी दिवस-पारितोषिक वितरण

Omkar B

वकिलांचा सत्कार चांगलाच सत्कर्मी लागला

Patil_p

प्रबोधिनीतर्फे उद्या बालसाहित्य संमेलन

Omkar B

बिल कलेक्टरना प्रतीक्षा परवानगीची

Amit Kulkarni