Tarun Bharat

मुरगाव हिंदू समाजाच्या घुमट आरती स्पर्धेत श्री राष्ट्रोळी दामोदर आरती मंडळ प्रथम

प्रतिनिधी /वास्को

मुरगांव हिंदू समाज श्री महालक्ष्मी पुजनोत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या मुरगांव तालुका मर्यादित घुमट आरती स्पर्धेत वास्कोतील श्री राष्ट्रोळी दामोदर घुमट आरती मंडळाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

स्पर्धेतील दुसरे बक्षीस श्री त्रिमूती घुमट आरती मंडळ (सडा) तर तिसरे बक्षीस श्री दामोदर आरती मंडळ (कासावली) यांना प्राप्त झाले. विजेत्या घुमट आरती पथकांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्को पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक उपस्थित होते. यावेळी श्री महालक्ष्मी पुजनोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शेखर खडपकर, नगरसेवक विनोद किनळेकर, उद्योजक चंद्रकांत गवस, उमेश साळगावकर, समाजाचे सहसचिव शैलेंद्र गोवेकर सहखजिनदार दामू कोचरेकर, सदस्य विजय नागवेकर व संतोष केरकर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी यावेळी बोलताना, घुमट वादन  ही गोव्याच्या भूमीतील कला आहे. या कलेचे रक्षण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन केले. सामाजिक संस्था व आजच्या युवकांनी आमच्या संस्कृतीचे जनत करायला हवे असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन आमदार दाजी साळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी समितीचे खजिनदार प्रताप गांवकर, सदस्य प्रकाश गावस, माजी उपाध्यक्ष आत्माराम नार्वेकर, विनायक घोंगे, भरत कोलगांवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण कपिल गावस व जय परब यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष केरकर यांनी केले तर शैलेंद्र गोवेकर यांनी आभार मानले.

Related Stories

मुरगावच्या नगराध्यक्षपदी दामू कासकर तर उपनगराध्यक्षपदी श्रद्धा महाले बिनविरोध

Amit Kulkarni

पंचायत निवडणुकीचा विषय आता सर्वोच्च न्यायालयात

Amit Kulkarni

रेल्वेच्या बांधकामासाठी आणलेले साहित्य लंपास : दोघांना अटक

Amit Kulkarni

सर्वत्र मुसळधार… रेकॉर्ड ब्रेक !

Amit Kulkarni

कर्मचारी भरती आयोग फक्त ‘फार्स’

Amit Kulkarni

व्यावसयिक घरपट्टी 50 टक्के कमी करण्याचा मनपाचा प्रस्ताव

Patil_p