Tarun Bharat

शाहू छत्रपतींनी एकाचा कपटपणा उघड केला: संजय राऊत

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोल्हापूर: संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष लढवण्यासाठी कोण तर पुढाकार घेत आहे. हे स्पष्ट दिसत होते. महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो डाव नसून कपट होता. तो कपट काय होता. हे स्वतः श्रीमंत शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.असे संजय राऊत म्हणाले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली आहे.संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून काही लोकांनी महाराष्ट्रात पेटवापेटवीची भाषा केली. शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा केली. शिवसेना कधीही खालच्या पातळीचे राजकारण केले नाही. सहावी जागा शिवसेनेचे असेल. अशी भूमिका आम्ही ठेवली होती.असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी जी भूमिका व्यक्त केली. त्या भूमिकेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजपने जो संभ्रम निर्माण केला होता तो आज श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रतिक्रियेने दूर झाला आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, कोल्हापूरच्या मातीने सत्य आणि प्रामाणिकपणाची कास सोडलेली नाही असे राऊत म्हणाले. शाहू महाराज यांना भेटून मी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून खेळी केली. असे विधान केले होते. मात्र हे विधान खोटे असल्याचे छत्रपती यांनी सिद्ध केले. आहे शाहू महाराज यांचा अनुभव दांडगा आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शाहू महाराज यांचा निकटचा स्नेह आहे. ठाकरे आणि छत्रपतींचा स्नेह काय आहे? हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.असेही राऊत म्हणाले.

Related Stories

चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

टाकाळा येथे गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी

Abhijeet Shinde

राज्यपाल कोश्यारी कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhijeet Shinde

मोकाट कुत्र्याने घेतला दोन मुलांचा चावा

Abhijeet Shinde

मलकापूर बाजार पेठेत आढळला बेवारस फिरस्ता मुलगा

Abhijeet Shinde

पावसाळ्यात चप्पल खरेदी करतायं; ‘या’ टिप्स फॉलो करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!