

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनतर्फे चेन्नई येथे आयोजित राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत बेळगावच्या सृष्टी अरूण पाटील हिने या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. तर रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे ठेवण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
चेन्नई येथे ट्रायथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी या राष्ट्रीय स्पर्धेसाठी बेंगळूर येथील बसवणगुडी येथे झालेल्या निवड चाचणीत सृष्टी पाटील प्रथम क्रमांक पटकावित या स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत 1.5 मीटर जलतरण, 40 कि. मी. सायकलिंग व 10 कि. मी. धावणे अशी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत सृष्टीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
खडतर मेहनत करून सृष्टीने या स्पर्धेसाठी सराव केला होता. परंतु संपूर्ण भारतातून अव्वल दर्जाचे खेळाडू असल्यामुळे तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
नुकत्याच झालेल्या बेळगाव येथे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत सृष्टीने प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकाविले. त्यामध्ये 400 मीटर जलतरण स्पर्धा, 10 कि. मी. सायकलींग व 5 कि. मी. धावणे अशी ही स्पर्धा होती. तिला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी व अजिंक्मय मेंडके, सायकलिंग प्रशिक्षक एम. पी. मरनुर व उमेश बेळगुंदकर व बसवंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचप्रमाणे अरूण पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.