Tarun Bharat

जीएसएस कॉलेजमध्ये श्रुजन विज्ञान महोत्सव

विज्ञान विषयातील विश्वकोश-दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळण्यासाठी आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीच्या जीएसएस महाविद्यालयात दि. 1 व 2 रोजी श्रुजन 2022 हा विज्ञान महोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाचे उद्घाटन सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष शरद वालावलकर, उपाध्यक्षा माधुरी शानभाग, उपप्राचार्य अरविंद हलगेकर, आरपीडीच्या प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, जीएसएसचे प्राचार्य प्रणव पित्रे, महोत्सवाचे समन्वयक डॉ. संदीप देशपांडे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. महोत्सवासाठी प्राचार्य बी. एल. मजुकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या महोत्सवात वर्तिका : चित्रकला, स्कायलॅड : प्रकल्प निर्मिती, बैठक : गटचर्चा, विवाद-समरा : वादविवाद, छायाग्राफीया : फोटोग्राफी, नृत्य : नृत्यकला, स्वरमंजिरी : गायनकला, ब्रेनटच : अभेद्यबुद्धी आणि शोध आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे शास्त्रज्ञांच्या माहितीची भित्तीचित्रे आणि विज्ञानकोश, विज्ञान विषयातील विश्वकोश आणि दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला.

शहरातील 20 महाविद्यालयांतील स्पर्धकांनी नावे नोंदविली होती. सोहळय़ाचा सांगता समारंभ 2 जुलै रोजी के. एम. गिरी सभागृहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळावा म्हणून आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. किरण ठाकुर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. तसेच यश प्राप्तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माधुरी शानभाग यांनीही विचार व्यक्त केले.

प्रा. अरविंद हलगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चेतना भागोजी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनाया पित्रे यांनी परिचय करून दिला. प्रा. विनायक बेल्लद यांनी महोत्सवाचा अहवाल वाचला. डॉ. संदीप देशपांडे यांनी आभार मानले. या महोत्सवातील श्रुजन 2022चे अजिंक्मयपद जीआयटीने तर उपविजेतेपद सीव्हीएएलसी कॉलेजने पटकाविले.    

Related Stories

लॉकडाऊनच्या काळातही लोकमान्यची रुग्णसेवा

Patil_p

सिटूचे 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन पुकारणार

Patil_p

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

Amit Kulkarni

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p

मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले

Amit Kulkarni

दुभाजकाच्या स्वच्छतेवेळी चांगली झाडे हटविण्याचा प्रकार

Patil_p