Tarun Bharat

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शुभम, सृष्टीची सुवर्णपदकी कामगिरी

प्रतिनिधी/कोल्हापूर

सागर पाटील जलतरण तलावात सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शनिवारी 100 मीटर बटरफ्लायमध्ये शुभम धायगुडे याने तर महिला खुल्या गटातील 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सृष्टी गोडसेने पहिला क्रमांक पटकावला. स्विमिंग हबच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेचा जलतरण प्रकार निहाय अन्य निकाल अनुक्रमे असा ः 100 मीटर बटरफ्लाय-प्रथमेश सोनार (दुसरा), अवधूत परळीकर. 400 मीटर आयएम ग्रुप-तनिष कुदळे, कौशिक शिरोळकर, धैर्यशील भोसले. मुली चैत्राली राणे, इंगळे-कदम, अपूर्वा पवार. 100 मीटर बटरफ्लाय ग्रुप-एस. शुभम, शाल्व मुळे, श्रीवर्धन पाटील. खुला गट 200 मीटर फ्रीस्टाइल- सृष्टी गोडसे, अनुष्का भोसले, अस्मिता महाक्के. 50 मीटर बटरफ्लाय- निधी सामंत, फ्रेया शहा, सम्राज्ञी जोशी.

या सर्व यशस्वी जलतरणपटूंना ऍड. गुलाबराव घोरपडे, चंद्रकांत यादव, भरत रसाळे, संजय भोसले, बंटी यादव, शरद बनसोडे, अमर पाटील, नंदू बामणे, भारती, पाटील, आर. व्ही. पाटील, बी. एल. पाटील, पी. के. कांबळे, अविनाश साळुंखे, विश्वास कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पदके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे आजचे इव्हेंटस् यशस्वी करण्यासाठी अजय पाठक, रमेश मोरे, दीपक घोडके, समीर चौगुले, उमेश कोडोलीकर, निलेश जाधव, निलेश मिसाळ, अजय पाटील व पप्पू सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

लॉकडाऊन काळातही मुलं असुरक्षित ?

Archana Banage

‘बायो-बबल’ तोडले तर मिळेल ‘ही’ शिक्षा!

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा ग्रीनबरोबर मध्यवर्ती करार

Patil_p

न्यूझीलंड संघात मॅट हेन्रीच्या जागी ब्रेसवेल

Patil_p

Kolhapur : बिबट्याकडून शाहूवाडीत गायीची शिकार

Abhijeet Khandekar

वासिम जाफरच्या सर्वोत्तम मुंबई संघाचे गावसकर-रोहित सलामीवीर

Patil_p