वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या दौऱयावर सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ येणार आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात चार दिवसांचे सामने तसेच तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत. राष्ट्रीय निवड समिती सदस्यांनी शुभमन गिलकडे भारत अ संघाचे नेतृत्व सोपविले आहे. या सामन्यांसाठी मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच अष्टपैलू शम्स मुलानीला संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करताना 25 वर्षीय मुलानीने वरिष्ठ तसेच 25 वर्षाखाली वयोगटातील स्पर्धांमध्ये 2021 च्या क्रिकेट हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची भारत अ संघात निवड करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड अ आणि भारत अ यांच्यात चार दिवसांचे तीन सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडून संघाची घोषणा करण्यात आलेली नाही पण गिलची कर्णधारपदी निवड जवळपास निश्चित झालेली आहे.
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील चार दिवसांचे तीन सामने होणार आहेत. पहिला सामना 1 ते 4 सप्टेंबर, दुसरा सामना 8 ते 11 सप्टेंबर, तिसरा सामना 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हे सर्व सामने बेंगळूरमध्ये खेळविले जातील. त्याचप्रमाणे उभय संघातील तीन वनडे सामने 22, 25, 27 सप्टेंबरला चेन्नईमध्ये होतील. न्यूझीलंड अ संघाचे नेतृत्व टॉम ब्रुसकडे राहिल. न्यूझीलंड अ संघाचा भारत दौरा यापूर्वी कोरोना महामारी समस्येमुळे पुढे ढकलण्यात आला होता. तोच दौरा आता सप्टेंबरमध्ये होणार आहे.
2021 च्या रणजी हंगामामध्ये मुलानीने 16.75 धावांच्या सरासरीने 45 बळी मिळविले आहेत. तसेच 25 वर्षाखालील वयोगटाच्या सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने तीन सामन्यात 29 गडी बाद केले आहेत. या दौऱयातील चार दिवसांच्या सामन्यासाठी मध्यप्रदेशच्या रजत पाटीदार, शार्दुल ठाकुर, सर्फराज खान, जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुभम शर्मा, यश दुबे, मोहमद सिराज, हनुमा विहारी, जे. सक्सेना, अक्षय वाडकर, शहबाज अहमद, आणि मणीशंकर मुरासिंग यांना संधी मिळणार आहे.
भारत अ संभाव्य संघ (चार दिवसांच्या सामन्यांसाठी) – शुभमन गिल (कर्णधार), यश दुबे, हनुमा विहारी, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, के. एस. भरत, मुलानी, सक्सेना, शार्दुल ठाकुर, मोहमद सिराज, जैस्वाल, शुभम शर्मा, अक्षय वाडकर, शहबाज अहमद, मुरासिंग.
भारत अ संभाव्य संघ (वनडेसाठी) – शुभमन गिल (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, हनुमा विहारी, इशान किसन, ऋषी धवन, वॉशिंग्टन सुंदर, प्रवीण दुबे, मयांक मार्कंडे, प्रसिद्ध कृष्णा, मोहमद सिराज, के. एस. भरत, व्यंकटेश अय्यर, पी. नारंग, राहुल चहर, आणि यश दयाल.