Tarun Bharat

प्रतिथयश व्यापारी श्यामसुंदर सामंत यांचे निधन

Shyamsundar Samant, a resident businessman, passed away

सावंतवाडीतील सामंत ब्रदर्स कापड दुकानाचे मालक श्यामसुंदर विष्णु सामंत ८२ रा. मळगाव मांजरेकरवाडी यांचे बुधवारी दुपारी १.४० च्या सुमारास निधन झाले. बुधवारी त्यांना सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली .


एक प्रतिथयश कापड व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती सावंतवाडी शहरातील हॉटेल सेव्हन हिल्सचे देखील मालक होते. सामाजिक व शैक्षणिक कार्यातही ते अग्रभागी असायचे मुंबई एक्यवर्धक संघाच्या मळगाव इंग्लिश स्कुलचे ते स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन राहिले होते प्रशालेच्या भौतिक विकासात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. मळगाव ब्राम्हणपाट येथील केंद्रशाळेच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,सुना तीन विवाहित मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. संजय सामंत व शैलेंद्र सामंत यांचे ते वडिल तर भाजपचे तालुका प्रवक्ते केतन आजगावकर यांचे ते मामा होत.

न्हावेली / वार्ताहर

Related Stories

सेवानिवृत्त पोलिस महादेव कानसे यांचे निधन

NIKHIL_N

आरामबसचा चालक मध्यरात्री गायब!

Patil_p

शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड,तानाजी सावंतांची लायकी काय?-विनायक राऊत

Abhijeet Khandekar

उद्योगमंत्र्यांच्या जिल्हय़ाला उद्योगांचीच प्रतीक्षा!

Patil_p

शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत कै.आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली

Anuja Kudatarkar

रत्नागिरीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक

Patil_p