वार्ताहर /काकती
वेदमूर्ती शिद्धलिंगय्या शिवपूजीमठ महास्वामींनी काकती पंचक्रोशीतील सर्व समाजातील नागरिकांचे निराकरण करून आयुष्यभर माणसे जपली होती. म्हणूनच संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे कृतज्ञतेने उभा आहे, असे प्रतिपादन रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामी यांनी केले.
येथील शिवपुजीमठात सिद्धलिंगय्या महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्री म. नि. प्र. गुरुसिद्ध स्वामीजी, कारंजीमठ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. व्यासपीठावर मृत्युंजय स्वामीजी हिरेमठ, शिवजातय्या स्वामीजींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उमादेवी शिवपुजीमठ यांनी स्वागत केले. राचय्या स्वामी शिवपुजीमठ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सिद्धलिंगय्या महास्वामीजी हिरेमठ म्हणाले, जातीभेद, भाषाभेद न करता कबाडकष्ट करणाऱया माणसांना एकोप्याने बांधण्याचे कार्य सिद्धलिंगय्या महास्वामींनी केले आहे.
आभार प्रा. मंजुश्री हावण्णावर यांनी मानले. यावेळी काकती, होनगा, गौंडवाड, देवगिरी व दुर्गम भागातील समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होता.