ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्या कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू असताना अचानक अभिनेता सिद्धार्थ आणि तृप्तीच्या ब्रेक अप झाल्याची चर्चा जोरदार व्हायरल होत आहे. सिद्धार्थ आणि तृप्तीनं २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
काहि दिवसांपुर्वी हे कपल दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले होते. पण दोघांचं इन्स्टा चेक केलं असता दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो दिसत नाहीये. आजकाल अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले तरी मुलांसाठी एकत्र डिनरला जातात, हॉलिडेवर देखील जातात. तसंच, सिद्धार्थ आणि तृप्ती मुलींना घेऊन दुबईत गेले आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. पण यावंर सिद्धार्थ आणि तृप्तीने काहीच वक्तव्य केलेलं नाहीये. त्यामुळे या दोघांचं नात्यात कटुता आली आहे की, या अफवा आहेत हे आपल्याला येणारा काळच सांगले.