लक्ष्मीटेक येथील रुद्रकेसरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : 4 मार्च रोजी महाप्रसाद
बेळगाव : तेज प्रतिबिंब पीठ, रुद्रकेसरी मठ सेवा समितीतर्फे श्री जगद्गुरु सिद्धारुढ महास्वामींचा 11 वा वार्षिक उत्सव समारंभ व धर्मसभा दि. 3 व 4 मार्च रोजी होणार आहे. यानिमित्त सैनिकनगर, लक्ष्मीटेक, गणेशपूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्रकेसरी मठाचे मठाधीश हरिगुरु महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तर शनिवार दि. 4 रोजी दुपारी महाप्रसाद होणार आहे. शुक्रवार दि. 3 मार्च रोजी पहाटे 6 पासून अखंड वीणा सेवेला सुरुवात होणार आहे. हरिगुरु महाराज यांनी केलेली जगद्जननी महाकाली अनुष्ठानाची सांगता होणार असून सकाळी 8 वाजता महाकाली दिव्य याग (होम) होणार आहे. यावेळी पूजेचे यजमान सौ. व श्री. अमेय हेरेकर हे आहेत. सायंकाळी 5 ते 7 पर्यंत जय भवानी महिपाळगड भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. 4 रोजी श्री गणेशमूर्ती अभिषेक शास्त्रीनगरचे अभिषेक सौ. व श्री. राजेश कदम, जगद्गुरु सिद्धारुढ स्वामी मूर्ती रुद्राभिषेक वाकड-पुणे येथील सौ. व श्री. प्रसाद घोरपडे, शिवलिंगाभिषेक सौ. व श्री. कल्लाप्पा सुंठे असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. य् ाावेळी परमपूज्य शिवानंद शिवाचार्य स्वामी, कृपानंद स्वामीजी, नागननाथ स्वामीजी, नीळकंठेश्वर शिवाचार्य स्वामीजी, सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी स्वामीजींच्या हस्ते सैनिकनगरमधील दहावी व बारावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये श्री ब्रह्मलिंगेश्वर भजनी मंडळ मण्णीकेरी, श्री राजा पंढरीचा भजनी मंडळ गळतगा-निपाणी, अडवी सिद्धेश्वर भजनी मंडळ वडगाव यांचा अखंड भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.