Tarun Bharat

सिद्धारूढांच्या चरणी लक्षदीपोत्सव

Advertisements

हुबळी – कार्तिक कृष्ण चतुर्दशी अमवस्येनिमित्त कर्नाटक आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत हुबळीच्या श्री सिद्धारूढ मठात लक्षदीपोत्सव साजरा करण्यात आला.
बुधवारी हुबळी सिद्धारूढ मठात झालेल्या लक्षदीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळला. हजारोंच्या संख्येने दाखल झालेले भाविकांनी श्री सिद्धारूढ आणि श्री गुरुनाथारूढांच्या चरणी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. संकटाचा अंधार दूर होऊन नवचैतन्याचा उजाळा मिळूदे अशी प्रार्थना केली . बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक यात सहभागी झाले होते. दिनेश चिल्लाळ नावाच्या एका कलाकाराने रांगोळीत श्री सिद्धारूढांचे अप्रतिम चित्र साकारले होते. हे लक्षवेधी ठरले होते.

Related Stories

आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत

Tousif Mujawar

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण संथगतीने

Omkar B

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

Amit Kulkarni

बिग बझारचा पब्लिक हॉलिडे सेल

Amit Kulkarni

मॅन्युअल स्कॅव्हेंजर सर्वेक्षण अहवाल चुकीचा

Omkar B

जांबोटी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!