ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Murder) हत्या प्रकरणातील दोन संशयित शार्पशूटर आणि पंजाब पोलिसांच्या तुकडीमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारा गोळीबार सुरु झाला आहे. पंजाबमधील (Panjab) अमृतसरजवळच्या अटारी बॉर्डरजवळ ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि संशयितांमध्ये सुरु असणाऱ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना घरातच थांबण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या आहेत. तर याचकमकीत ४ आरोपी ठार झालेत.
दरम्यान, पंजाबी गायक सिंद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी आणि पंजाब पोलीसांच्यात अटारी बॉर्डरजवळ चकमक झाली. या चकमकीत सिंद्धू मूसेवालाचे हल्लेखोर जगरूप सिंह रुपा आणि मनप्रीत सिंह उर्फ मन्नू कुसाचा पोलीसांनी एनकाऊंटर केला. चकमकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून चार आरोपी ठार झाले.
अटारी सीमेजवळच्या भाकना कालन गावामध्ये ही चकमक सुरु असून गावातील एका बंगल्यामध्ये हल्लेखोर लपल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या बंगल्याला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी ही चकमक सुरु आहे तो भाग भारत पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने हे हल्लेखोर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीतही असल्याची शक्यता एका माजी पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलीय.
हे ही वाचा : यूपीत भाजपला धक्का, जलसंपदा मंत्र्याचा राजीनामा
भारत पाक सीमेच्या बाजूने पोलीसांच्या टीमला मदत पोहोचवली जात आहे. एका जुन्या इमारतीत जगरूप सिंह रूपा आणि मन्नू कूसा लपले होते.दोन तासापासून या परिसरात चकमक सुरू आहे. यावरून आरोपींकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
गैंगस्टर जगरूप सिंह रूपा आणि मन्नू कूसा असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाला. मन्नू कूसा एके-47 ने फायरिंग करत होता. या चकमकीत ३ पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.