बेळगाव : भारतीय हवाई दलातील सर्वात जुन्या विमानांपैकी एक असणाऱ्या हार्वर्ड टी 6 जी 2 हे विमान नुकतेच बेळगाव विमानतळावर दृष्टीस पडले. पहिल्यांदाच आलेल्या या विंटेज विमानाला बेळगावमध्ये वॉटर सॅल्यूट देण्यात आला. 1947 पासून हे विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात आहे. दोन आसनी क्षमता असणारे हे विमान मागील अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. रविवारी हे विमान इंधन भरण्यासाठी विमानतळावर दाखल झाले. पहिल्यांदाच असे विंटेज विमान विमानतळावर दाखल झाल्याने त्याला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. त्यामधून आलेल्या वैमानिकांचे विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
Previous Articleअपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
Next Article स्थायी समिती निवडणुकांसाठी कौन्सिल विभाग सज्ज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.