ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला पर्याय म्हणून अनेकांनी ‘सिग्नल’ ॲपची निवड केली. गुगल प्ले स्टोअरच्या टॉप लिस्टमध्ये व्हॉट्सॲपला मागे टाकत सिग्नलने बाजी मारली आहे. त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करताना लोकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका युजर्सच्या ट्विटनंतर सिग्नल ॲपने याला दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. या पॉलिसीनुसार युजर्सचा डेटा शेअर करण्यात येणार होता. त्यामुळे युजर्सने प्रायव्हसी राहणार नसल्याने व्हॉट्सॲप डिलीट करून ‘सिग्नल’ आणि ‘टेलिग्राम’ ॲपकडे आपला मोर्चा वळवला आहे. 7 दिवसातच व्हॉट्सॲपचे 35 % युजर्स कमी झाले. दरम्यान, व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी अंमलबजावणी सध्या लांबणीवर पडली आहे. तरी देखील 24 लाख लोकांनी सिग्नल तर 16 लाख लोकांनी टेलिग्राम ॲप डाऊनलोड केले आहे.