नंदगड प्रतिनिधी – बेकवाड (ता. खानापूर) येथील हनुमान मंदिरासमोर सालाबादप्रमाणे नवरात्री निमित्त लक्ष्मण पाटील यांच्या अधिष्ठानाखाली अखंड विणा हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्त रोज सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी नवव्या व बाराव्या अध्यायाचे वाचन, सायंकाळी ७ वाजता प्रवचन, व रात्री ८ वाजता कीर्तन, त्यानंतर जागर भजन आदी कार्यक्रम होत आहेत. रोज पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत होणाऱ्या भजन व काकड आरतीला 500 हून अधिक महिलांची उपस्थिती लाभत आहे. हरी नामासाठी गावातील वारकऱ्यांसह नागरिक ही उपस्थित राहत आहेत. या उत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवार दि. ३० रोजी धनंजय ओलकर आळंदी यांचे प्रवचन व त्यानंतर त्यांचेच किर्तन, शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी आनंद महाराज आळंदी यांचे प्रवचन व त्यानंतर त्यांचेच कीर्तन, रविवार दि.२ रोजी बाळू भक्तीकर चिरमुरी यांचे प्रवचन व त्यानंतर त्यांचेच कीर्तन, सोमवार दि.3 रोजी काला कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.


previous post