Tarun Bharat

सोने महागण्याचे संकेत

आयात शुल्कात 4.25 टक्के वाढ ः सोनेदरात प्रतितोळा 2,500 रुपये वाढ शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात नजीकच्या काळात सोने महागण्याचे संकेत शुक्रवारी मिळाले. सोन्यावरील मूळ आयात शुल्क (कस्टम डय़ुटी) 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सद्यस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सरकार चिंतेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयात कमी करून सरकारला व्यापारी तूट कमी करायची आहे. सोन्याची आयात कमी झाल्यास रुपयाला बळ मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

भारत आपली सोन्याची बहुतांश मागणी आयातीद्वारे भागवतो. सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत पातळीवर सोने महाग होणार असून ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत प्रति 10 ग्रॅम 2500 रुपयांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज इंडियन बुलियन गोल्ड असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला.

भारताने मे महिन्यात 6.03 अब्ज डॉलर्स किमतीचे सोने आयात केले. आयातीचे हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत नऊ पटीने अधिक आहे. मे महिन्यात देशाची व्यापार तूट 24.29 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर गेली. कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या मोठय़ा आयातीमुळे परकीय गंगाजळी संपुष्टात आली आहे. सरकार ग्राहकांना सोन्याऐवजी गोल्ड बॉण्ड्स, ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे.

2021 मध्ये 1000 टन सोन्याची आयात

भारत हा जगातील दुसऱया क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. गेल्या वषी भारताने एका दशकात सर्वाधिक सोने आयात केले. 2021 मध्ये देशात 1000 टनांपेक्षा जास्त सोने आयात करण्यात आले. कोरोना महामारीनंतर मागणीत सुधारणा झाल्यामुळे हे प्रमाण वाढले आहे. यावषी सरकारने आयात शुल्कात वाढ केली आहे. याउलट गेल्यावषी सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळे दर नियंत्रणात राहिल्याने मागणीत वाढ झाली होती.

सोन्याची तस्करी कमी करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी अनेक बडय़ा ज्वेलर्सनी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडे केली होती. चीन, अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांनी देशांतर्गत बाजारपेठ मजबूत करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क रद्द केले होते.

Related Stories

विक्रमी! देशात 24 तासात 1.84 लाख बाधितांची नोंद

datta jadhav

नव्या एसएसएलव्हीचे प्रक्षेपण करणार इस्रो

Patil_p

पंजाबात पुन्हा एकाची जमावाकडून हत्या

Patil_p

हिमाचल प्रदेश : 4 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार सर्व शाळा

Tousif Mujawar

New delhi; दिल्लीत वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Patil_p

समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचे दिल्लीत निधन

Tousif Mujawar