सांगरुळ /वार्ताहर
येथील छत्रपती शाहू (नाळे) तालीम मंडळ सांगरुळ यांचे वतीने झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेख (गंगावेस ता . कोल्हापूर ) यांनी महान भारत केसरी भोला ठाकूर (पंजाब ) याच्यावर अकराव्या मिनिटाला एकलंगी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवत रोख दोन लाख इनामासह शाहू केसरी किताबासह चांदीची गदा पटकावली. प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा महान भारत केसरी पै माऊली जमदाडे यांने मुंबई महापौर केसरी भारत मदने यांच्यावर गुणावर विजय मिळवत. रोक एक लाख रुपये इनासहस आदियोगी वॉरिअर्स केसरी किताबाचा मानकरी ठरला . द्वितीय क्रमांकाच्या लढतीत सेनादलच्या संग्राम पाटील (आमशी) याने पै अरुण बोगार्डे ( मोतीबाग ) याचेवर समोरून झोळी डावावर विजय मिळवत छत्रपती केसरी किताब पटकाविला .
पै सिकंदर शेख व पै. भोला ठाकूर यांच्यातील लढतीला प्रमुख पाहुणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते व खा .संजय मंडलिक खा . धैर्यशील माने आ. प्रा जयंत आसगावकर मा आ .चंद्रदीप नरके विश्वासराव पाटील सुशांत नाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी ठीक ९.४६ मिनिटांनी प्रारंभ झाला .सलामी झडताच दुसऱ्याच मिनिटाला आक्रमक होत सिकंदरने बगल डूब डाव टाकत भोलाचा ताबा घेतला .सिकंदर एकचाक डावाची पकड करत असताना भोलाने त्यातून सुटका करून घेतली .पुढच्याच मिनिटाला सिकंदरने दस्ती खेचत भोलाचा ताबा घेतला .आणि कुस्तीच्या नव्या मिनिटाला कोंदे एकचाक डावावर भोलाला चित्रपट करून त्याच्या छातीवर बसला.
पै माऊली जमदाडे व पै . भारत मदने यांच्यात झालेल्या प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत माऊलीने सलामीलाच आक्रमक होत एकेरी पट काढत भारतवर ताबा मिळवला .पण कुस्ती कडेला गेल्याने मध्यभागी घेऊन लावण्यात आली यावेळी डाव देण्यास भारतने नकार दिला .पण माऊलीने पुन्हा खडाखडीने कुस्ती करण्यास मान्यता दिल्याने कुस्ती नवीन सुरू झाली . एकेरी पट काढत भारतने माऊलीवर ताबा मिळविला .पण माऊलीने यातून सुटका करून घेत भारतचा ताबा घेतला . बराच वेळ झाला तरी कुस्ती निकाली न झाल्याने कुस्ती गुणावर घेण्याचा संयोजकांनी निर्णय घेतला . यात माऊलीने एकेरी पट काढत भारतवर ताबा मिळवत पहिला गुण घेतला पंचांनी माऊलीला विजयी घोषित केले .
या कुस्तीत माऊलीने प्रेक्षकांची मने जिंकलीत
-द्वितीय क्रमांकाच्या लढतीत सेनादलच्या संग्राम पाटील यांनी मोतीबाग तालमीच्या अरुण बोंगार्डेवर समोरून ढाक मारत प्रेक्षणीय विजय मिळवला .
पै.धैर्यशील लोंढे, पै.केदार खाडे , पै.साई सुतार, शुभम खाडे अनुज घुंगुरकर, हर्षद कापडे ( सांगरुळ ) या स्थानिक मल्ला बरोबरच प्रशांत जगताप (इचलकरंजी )पै . सनिकेत राऊत ( कुंभी कारखाना ), प्रज्वल कांबळे ( न्यू मोतीबाग ), पार्थ कळंत्रे ( बाचणी ), संकेत पाटील (आमशी ) रोहित पाटील (साबळेवाडी ) यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणिय विजय मिळविलेत .याशिवाय शंभरावर लहान मोठ्या प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणार्या चटकदार कुस्त्या झाल्या .
कुस्ती मैदानासाठी सांगरुळ बाजारवाडा येथे भव्य चौकात कै. पै निवृत्ती रामचंद्र नाळे (रामजी मास्तर) कुस्ती आखाडा तयार कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे महान मल्ल हिंदकेसरी पै दिनानाथ सिंह यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन या कुस्ती मैदानात सन्मानित करण्यात आले .पंच म्हणून पै गुंडाजी पाटील पै सर्जेराव पाटील पै रघुनाथ मोरे पै बाजीराव पाटील पै बाबा शिरगांवकर पै आण्णा नाळे दत्ता नाळे गजानन यादव यांनी काम पाहिले. .निवेदन पै .यशवंत पाटील दोनवडेकर व नागनाथ नाळे यांनी केले .
यावेळी केडीसीसीचे संचालक बाबासाहेब पाटील गोकुळचे संचालक अजित नरके एस आर पाटील कुंभी कासरी साखर कारखान्याचे व्हा . चेअरमन विश्वास पाटील (कोगेकर) यांचे सर्व संचालक पैलवान निवास वातकर राहूल खाडे पैलवान मारुती जाधव गरुड रोटावेटर चे संभाजी पाटील यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे महान मल्ल हिंदकेसरी पै दिनानाथ सिंह यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन या कुस्ती मैदानात सन्मानित करण्यात आले .
मैदानाबरोबर कुस्ती शौकीनांची मनेही जिंकली
पैलवान सिकंदर शेखच्या कामगिरीने त्याचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे सिकंदर शेख व माऊली जमदाडे यांचे आखाड्यावर आगमन होतात प्रेक्षकांनी टाळ्यांच्या करताना त्यांचे स्वागत केले .कुस्ती सुरू असताना डाव व प्रति डाव यालाही टाळ्या वाजवून दाद देत होते .तसेच कुस्ती झाल्यानंतर त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीउपस्थित तरुणांची व लहान मुलांच्या बरोबरच कुस्ती शौकीनांची एकच झुबंड उसळली होती .आखाड्यापासून गाडीत बसेपर्यंत त्याच्याभोवती प्रेक्षकांचा गराडा होता .
रेकॉर्डब्रेक गर्दीने मैदान अपुरे
सिकंदर शेखची कुस्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच होत असल्याने या कुस्ती बदल परिसरात जोरदार वातावरण निर्मिती झाली होती . यामुळे मैदानात कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती .सायंकाळी मैदान खचाखच भरले होते ..मैदानाच्या परिसरातील सर्व घरांच्या बालकणी व छतावर बसून कुस्तीशौकीन कुस्तीचा आस्वाद घेत होते .
प्रतीक्षा बागडीचा सत्कार
पहिली महाराष्ट्र केसरी महिला पैलवान प्रतीक्षा बागडी हिचे सांगरुळ गावाशी ऋणानुबंध असल्याने तिचा मैदान सहितकांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.