Tarun Bharat

सिक्की रेड्डी-रोहन कपूर उपांत्य फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ हो चि मिन्ह सिटी

भारताची मिश्र दुहेरीची जोडी रोहन कपूर व एन.सिक्की रेड्डी यांनी येथे सुरू असलेल्या व्हिएतनाम ओपन सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

सिक्की व कपूर या बिगरमानांकित जोडीने गेल्या आठवडय़ात छत्तीसगड इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. येथे त्यांनी तिसऱया मानांकित मलेशियाच्या चॅन पेंग सून व चीआह यी सी यांना 21-19, 21-17 असा पराभवाचा धक्का दिला. 39 मिनिटांत त्यांनी हा सामना संपवला. उपांत्य फेरीत त्यांची लढत इंडोनेशियाच्या रेहान नौफल कुशारजंतो व लिसा आयु कुसुमावती या अग्रमानांकित जोडीशी होणार आहे.

सिक्की व कपूर यांनी कणखर खेळाचे प्रदर्शन करीत 3-6 ची पिछाडी भरून काढत एका गुणाची अल्पशी आघाडी मिळविली. मलेशियन जोडीने पुन्हा 15-12 अशी आघाडी घेतली. पण भारतीय जोडीने बाजू पलटवत सलग चार गुण घेत 19-18 अशी बढत घेतली. नंतर दोन गुण घेत हा गेम जिंकून 1-0 अशी आघाडी मिळविली. दुसऱया गेममध्ये भारतीय जोडीने अधिक आत्मविश्वासाने खेळ केला. मलेशियन जोडीने 10-8 अशी आघाडी काही वेळ घेतली असली तरी 12-12 अशी बरोबरी केल्यानंतर भारतीय जोडीने गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.

Related Stories

गोव्यात विजेंदरची लढत रशियाच्या लॉप्सनविरुद्ध

Patil_p

मुंबई इंडियन्स निर्धास्त, दिल्ली कॅपिटल्ससमोर मात्र आव्हान

Patil_p

विम्बल्डन स्पर्धेपर्यंत डब्ल्यूटीएचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा लांबणीवर

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे अग्रस्थान कायम

Patil_p

ईस्ट बंगालची लढत हैदराबाद एफसीशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!