वृत्तसंस्था/ सँटन्डेर (स्पेन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या विश्व कनि÷ांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत मुलांच्या एकेरीत भारताच्या शंकर मुथुस्वामीने रौप्यपदक पटकाविले.
सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत चीन तैपेईच्या कुओ कुआन लीन याने भारताच्या चौथ्या मानांकित शंकर मुथुस्वामीचा 21-14, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. चीनच्या लीनने सुवर्णपदक तर भारताच्या शंकर मुथुस्वामीला रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत पदक मिळविणारा शंकर मुथुस्वामी हा चौथा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. 1996 साली या स्पर्धेत भारताच्या अपर्णा पोपटने, 2006 साली सायना नेहवालने तर 2015 साली सिरिल वर्माने पदके मिळविली होती. सायना नेहवालने 2008 साली या स्पर्धेत कनि÷ मुलींच्या गटातील विश्वविजेतेपद पटकाविले होते.