Tarun Bharat

संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन पुण्यात

पुणे / प्रतिनिधी :

Silver jubilee convention of Sambhaji Brigade in Pune संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन येत्या 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, खा. श्रीनिवास पाटील हे या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने, तसेच अभिनेते अशोक समर्थ आणि प्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अधिवेशनात ‘खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरचा भारत आणि जग’, ‘एकविसावे शतक – स्टार्टअप्सचे युग’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्या ‘मराठा कम्युनिटी बिजनेस कम्युनिटी’ या महत्वाकांक्षी धोरणाच्या अनुषंगाने ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिवेशनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सायंकाळी 5.30 वाजता होणार असून, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी असणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा.मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे या समारोपाच्या समारंभात उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

निर्जिव मनाचे लोकच असे करु शकतात:शमीला धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर

Archana Banage

पुण्यात मनसेला खिंडार; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

datta jadhav

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर ‘असा’ साजरा होणार ‘शिवराज्याभिषेक दिन’

Tousif Mujawar

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार?; राजभवनाने दिलं स्पष्टीकरण

Archana Banage

“महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार”

Archana Banage

शिल्लक सेनेत आदित्य सरपंच तरी होईल का?

datta jadhav
error: Content is protected !!