ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्यपदकाला गवसणी घातली. 55 किलो वजनी गटात संकेतने एकूण 248 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. भारताचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले पदक आहे.
संकेत सरगर सांगली जिल्ह्यातील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्टस ऍण्ड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये 55 किलो वजनी गटात सहभागी संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नातच 135 किलो वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये त्याने 113 किलो वजन उचललं. त्यामुळे त्याने एकूण 248 किलो वजन उचलत तो सुवर्ण पदकाच्या रेसमध्ये आघाडीवर होता. पण अखेरच्या क्षणी मलेशियाच्या मोहम्मद अनिकने संकेतपेक्षा फक्त 1 किलो वजन जास्त उचलत सुवर्णपदक पटकावले.
हेही वाचा : राज ठाकरेंनी काढली ‘कोश्यारींची होशियारी’, म्हणाले…