Tarun Bharat

अंजुम मोदगिलला रौप्यपदक

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

इजिप्तमधील कैरो येथे वर्ष अखेरीच्या आयएसएसएफ प्रेसिडेंट चषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज अंजुम मोदगिलने महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये अंजुमची दुसऱया क्रमांकाची सर्वोत्तम महिला नेमबाज म्हणून निवड करण्यात आली.

महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारातील सुवर्ण पदकासाठी झालेल्या लढतीत जर्मनीच्या ऍना जेनसेनने अंजुम मोदगिलचा 16-14 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या प्रकारात अंजुमला रौप्यपदक मिळाले. अंजुमने नेमबाजीच्या या क्रीडाप्रकारात गेल्या गुरुवारी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. शुक्रवारी या स्पर्धेमध्ये भारताचा नेमबाज रूद्रांक्ष पाटीलने दर्जेदार कामगिरी करत प्रेसिडेंट चषक पटकाविला होता.

Related Stories

कोव्हिडमुळे यंदा टी-20 वर्ल्डकप शक्य नाही

Patil_p

नेमबाज अपूर्वी चंडेलाला कोरोनाची बाधा

Amit Kulkarni

वेदा कृष्णमूर्तीला पंधरवडय़ात दोन धक्के

Amit Kulkarni

लखनौ- हैदराबाद यांच्यात आज लढत

Patil_p

महिला हॉकीत नेदरलँड्सला चौथ्यांदा सुवर्ण

Patil_p

विंडीजचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम जाहीर

Patil_p