Tarun Bharat

देवेंद्र झाझरियाला रौप्यपदक

वृत्तसंस्था/ मॅराकेश (मोरोक्को)

शनिवारी येथे झालेल्या विश्व पॅरा ऍथलेटिक्स ग्रां प्रि स्पर्धेत भारताचा पॅरा भालाफेकधारक ऍथलिट देवेंद्र झाझरियाने भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकाविले. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

मोरोक्कोतील विश्व पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झाझरियाने 60.97 मीटरचा भालाफेक करत रौप्यपदक पटकाविले. त्याचप्रमाणे या क्रीडा प्रकारात भाताच्या अजित कुमारने 64 मीटरचा भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले. 2004 च्या ऍथेन्स तसेच 2016 च्या रिओ आणि 2020 च्या टोकियोतील पॅराऑलिम्पिक स्पर्धेत देवेंद्रने अनुक्रमे सुवर्ण आणि दोन रौप्यपदके मिळविली आहेत. त्याचप्रमाणे त्याने 2013 साली विश्व पॅराऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक तर 2015 च्या डोहा येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे.

Related Stories

उन्नती हुडा, अनिश यांना रौप्यपदके

Patil_p

माजी हॉकीपटू एमके कौशिक यांना कोरोनाची लागण

Patil_p

राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत अमृता पुजारीला सुवर्ण, नेहा चौगलेला रौप्य तर सायली दंडवतेला कांस्य

Archana Banage

लंकेचा ऑस्ट्रेलियावर डावाने दणदणीत विजय

Patil_p

कोणी साकारला मैदानावरच ‘बिहू डान्स’?

Omkar B

एस. शरथची कनिष्ठ निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती

Patil_p