वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेची जागतिक दर्जाची महिला जिम्नॅस्ट सिमोनी बाईल्सने आपल्या वैयक्तिक जिम्नॅस्ट कारकिर्दीतील 11 वे पदक मिळविले आहे. या स्पर्धेत तिने फ्लोअर एक्सरसाईज जिम्नॅस्ट प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे. अमेरिकेच्या बाईल्सचे ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा राहिल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बाईल्सने सोमवारी जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळविले होते. फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात तिने दुसरे स्थान घेत रौप्य पदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात ब्राझीलच्या रिबेका अंद्रादेने सुवर्णपदक तर अमेरिकेच्या जॉर्डन चिलेसने कास्य पदक घेतले.