फर्मने 2500 कर्मचाऱयांनी कमी केले तर अमेरिकेच्या एड-टेक कंपनीच्या खरेदीची तयारी
वृत्तसंस्था /बेंगळूर
सर्वात मोठी एड-टेक कंपनी बायजूस दोन वेगवेगळय़ा देशांमध्ये वेगवेगळय़ा कारणांमुळे चर्चेत आहे. यातील पहिले कारण म्हणजे 2055 कर्मचाऱयांची कपात केल्याचे तर दुसऱया बाजूला कंपनीने नॅस्डेकवर लिस्टेड एड-टेक कंपनी 2 यू खरेदीचा व्यवहार केला आहे.
मनी कंट्रोल यांच्या एका अहवालानुसार दावा करण्यात आला आहे, की भारताची 22 अब्ज डॉलरची फर्मने कॉस्ट कटिंगसाठी आपल्या समूहातील कंपनी व्हाईटहॅट ज्युनिअर आणि टॉपर यातून 27 जून आणि 28 जून रोजी 1500 पेक्षा अधिक व 29 जून रोजी 1,000 कर्मचाऱयांना कमा r केले आहे. यामध्ये सेल्स आणि मार्केटिंग, ऑपरेशन, कंटेंट व डिझाईन टिमच्या पूर्ण टाईम व कॉन्ट्रक्च्युअल कर्मचाऱयांचा समावेश झाल्याची माहिती आहे. काही कर्मचाऱयांना 27 जून रोजी सायंकाळी त्यांनी मॅनेजर्स व एचआर यांना फोन करुन त्यानंतर राजीनामा मागविल्याची माहिती आहे.
आता 2 यू चे अधिग्रहण
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार बायजूसने मागील आठवडय़ात 2 यू च्या बोर्डाचे अधिग्रहण करण्यासाठी 15 डॉलर प्रति समभाग ऑफर दिली आहे. बुधवारी नॅस्डॅकवर 2 यूचा समभाग 10.92 डॉलरवर बंद झाला आहे. या भावामधून बायजूसची ऑफर जवळपास 60 टक्के प्रिमियमवर राहिली आहे. या 2 यू ची एन्टरप्राइस व्हॅल्यू जवळपास 2अब्ज डॉलर बनत आहे.