Tarun Bharat

सिंगीनकोप्प ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संगणकीय उतारे देण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

खानापूर तालुक्मयातील सिंगीनकोप्प गावातील काही कुटुंबांच्या घरांचे संगणकीय उतारे मिळणे कठीण झाले आहे. सरकारने गावठाण जमिनीमध्ये घरे बांधून दिली. त्याची नोंद झाली. मात्र अजूनही संगणकीय उतारे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. तेव्हा तातडीने संगणकीय उतारे द्यावेत यासाठी सिंगीनकोप्प ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

ईदलहोंड ग्राम पंचायतीच्या अखत्यारित सिंगीनकोप्प गाव येते. या गावामध्ये जवळपास 80 कुटुंबांना गावठाण जमिनीमध्ये घरे बांधून देण्यात आली आहेत. ग्राम पंचायतमध्ये त्याची रितसर नोंद झाली आहे. मात्र संगणक उतारा मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा याबाबत संबंधित अधिकाऱयांना सूचना करून सर्वांना संगणकीय उतारे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, 1969 साली ही घरे बांधून देण्यात आली आहेत. जवळपास 50 वर्षे उलटली तरी आम्हाला संगणकीय उतारा दिला जात नाही. त्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा तातडीने संगणकीय उतारे देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर, यल्लाप्पा होसुरकर, लक्ष्मण पाटील, कल्पना कुंभार, दुद्दाप्पा पुंभार, बयाबाई कुंभार, बाळकृष्ण कुंभार, सुरेखा कुंभार, महेश कुंभार, सुरेखा खानापूरकर, वसंत सुतार, मोहन सुतार, परशराम कुंभार, मारुती कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं.साठी पहिल्या टप्प्यात मतदान

Patil_p

धारवाड रोडवरील ‘त्या’ समस्येचे निवारण

Amit Kulkarni

एसीबीच्या छाप्याने बेळगावात खळबळ

Tousif Mujawar

सर्व ग्रा.पं.वर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा!

Patil_p

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

Patil_p

पायलट बनलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार

Amit Kulkarni