Tarun Bharat

मध्यप्रदेशात भाजपचा एकहाती विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळविल्याचा दावा मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केला आहे. ग्राम पंचायत, जनपाद पंचायत आणि जिल्हा पंचायत या तिन्ही स्तरातील निवडणुकांमध्ये भाजपने 80 टक्क्मयांहून अधिक जागा मिळविल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 23 हजार ग्राम पंचायतींपैकी भाजपसमर्थित उमेदवारांनी 90 टक्के जागा जिंकल्या आहेत. 23 हजार 613 ठिकाणी त्यांचा विजय झाला आहे. यातील 625 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे 312 जनपाद पंचायतींपैकी 227 पंचायतींमध्ये भाजपपुरस्कृत उमेदवारांचा विजय झाला आहे. 20 अन्य जनपाद पंचायतीही भाजपशी संलग्न असणाऱया पक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ 64 पंचायतींमध्ये यश मिळाले आहे. जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपसमर्थित उमेदवारांनी 51 जिल्हा पंचायतींपैकी 41 मध्ये बहुमत मिळविले आहे. यापैकी अनेक जिल्हा पंचायतींमध्ये 80 टक्क्मयांहून अधिक जागा मिळविल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी यादृष्टीने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिले जात होते. भाजपला मिळालेले यश विधानसभा निवडणुकीतही परिवर्तित होईल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.

Related Stories

उत्तराखंडात दिवसभरात 200 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

आणखी एका शेतकऱयाची गाझीपूर सीमेवर आत्महत्या

Patil_p

शेतकरी आंदोलक दोन दिवसात माघारी

Patil_p

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

बांगलादेशला मिळाला पहिला तृतीयपंथीय न्यूज अँकर

Patil_p

विदेशी चलन भांडार 541.66 अब्ज डॉलर्सवर

Patil_p
error: Content is protected !!