वृत्तसंस्था / पोर्टोरोझ (स्लोव्हेनिया)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या कॅटरिना सिनियाकोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना विम्बल्डन विजेत्या कझाकस्तानच्या इलेना रिबेकिनाला पराभवाचा धक्का दिला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनियाकोव्हाने कझाकस्तानच्या 25 व्या मानांकित रिबेकिनाचा 6-7 (4-7), 7-6 (7-5), 6-4 असा पराभव केला. ही स्पर्धा हार्डकोर्टवर खेळविली गेली. 2017 नंतर 26 वषीय सिनियाकोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील एकेरीचे हे पहिले जेतेपद आहे. सिनियाकोव्हाने महिला दुहेरीत पेसिकोव्हासमवेत 2022 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अजिंक्मयपदे मिळवली आहेत.