जपानमधील अनोखा प्रकार
हॅप्पी फॅमिलीचे कल्चर आता केवळ छायाचित्रांपुरतीच मर्यादित राहिले आहे. माणूस काळ आणि वयासोबत एकटा पडत चालला आहे. एक परिवार अनेक कारणांमुळे विभागला जातो आणि लोक पूर्ण परिवार असतानाही एकाकीपणा आणि नैराश्य यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देतात. अनेकदा लोक एकाकीपणा दूर करण्यासाठी गॅझेट्स आणि पाळीव प्राण्यांची मदत घेतात. परंतु यामुळे देखील कित्येकदा नैराश्य दूर होत नाही. अशा एकाकीपणाला तोंड देणाऱया लोकांची समस्या दूर करण्यासाठी जपानमध्ये एक रंजक पद्धत शोधून काढण्यात आली आहे.
जपानमधील विशेष सेवा
अशा लोकांच्या मदतीसाठी जपानमध्ये विशेष सेवा पुरविली जाते. याच्या अंतर्गत लोक भाडय़ाने बहिणी मिळवू शकतात. भाडय़ाने येणाऱया या बहिणी तुमच्यासोबत कुटुंबीयांप्रमाणे वागत असल्याने एकाकीपणा दूर होण्यास मदत मिळते. जपानी तरुणाई हिकिकोमोरी नावाच्या एका मानसिक आजाराने त्रसत आहे. या मनोवस्थेत तरुणाई विशेषकरून पुरुष स्वतःला समाजापासून पूर्णपणे दूर करतो आणि स्वतःच्या घरातून बाहेरच पडू इच्छित नाही. यामुळे तो कित्येक महिने आणि अनेकदा वर्षांपर्यंत घरातून बाहेर पडत नाही. मोबाइल गेम्स आणि इंटरनेटलाच स्वतःचे जग बनवू लागतो.
ड्रीम स्टार्ट नावाची कंपनी
अशा लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जपानमध्ये भाडेतत्वावर बहिणी मिळतात. ज्या मुलांना अशा स्थितीला सामोरे जावे लागते, ते स्वतःची स्थिती इतरांपासून लपवतात आणि उपचारासाठी मार्ग शोधू लागतात. ‘ड्रीम स्टार्ट’ नावाच्या एका जपानी कंपनीने अशाप्रकारच्या लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. बीबीसीने 2019मध्ये एक माहितीपट तयार करत यात विस्तृतपणे भाडेतत्वावरील बहिणींबद्दल माहिती दिली होती.