10 वर्षीय मुलाची कृती
तेलंगणात इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱया एका विद्यार्थ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. 10 वर्षीय या मुलानेएका समस्येवर उपाययोजना करविण्यासाठी प्रशासनाची झोप उडविली आहे. स्वतःच्या गावातील नागरी समस्या निकालात काढण्यासाठी त्याने धरणे आंदोलन केले आहे. आता गावातील लोक त्याचे कौतुक करत आहे. या मुलाचे नाव केशव असून तो तेलंगणाच्या पेद्दापल्ली जिल्हय़ातील रहिवासी आहे.
बुधवारी पहाटे तो स्वतःची मोठी बहिण वेदश्रीसोबत जॉगिंग करत होता. यादरम्यान वेदश्रीला एका विषारी किडय़ाने दंश केला होता. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. रुग्णालयात स्वतःच्या बहिणीची अवस्था पाहिल्यावर दुखावलेल्या केशवने तिला ज्या ठिकाणी किडय़ाने दंश केला होता तेथे जात धरणे आंदोलन केले आहे. परिसरात साफसफाई करण्याची मागणी त्याने केली आहे.
10 वर्षीय मुलाचे आंदोलन स्थानिक लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित अधिकाऱयांच्या नागरी समस्या निदर्शनास आणून देत स्वतःची सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱया मुलाचे कौतुक केले जात आहे. अत्यंत कमी वयात मुलाने केलेल्या आंदोलनाबद्दल अधिकाऱयांच्या प्रतिक्रियेची आता प्रतीक्षा करण्यत आहे. सध्यातरी या मुलाच्या मागणीवरून अधिकाऱयांनी कुठलेच पाऊल उचललेले नाही.