नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. त्यांना पोटात जंतुसंसर्ग झाल्याने येथे आणण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ही नियमित तपासणी होती. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले असून त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे.